घाम शेतात आमचा गळे,
चोर ऐतच घेऊन पळे
धन चोरांचा हा पळण्याचा फाटा कु ठाय हो?
न्याय वेशीला टांगा सदा,
माल त्याचा की आमचा वदा
करा निवाडा आणा तराजु, काटा कु ठाय हो?
लोणी सारं तिकडं पळं,
इथं भुके नं जिवडा जळं
दकानवालेदादा आमचा आटा कु ठाय हो?
इथ बिऱ्हहाड उघड्यावर,
तिथं लुगडी लुगड्यावर
या दबुळीचं धुडकं -फडकं धाटा कु ठाय हो?
इथं मीठ मिरची अन् तुरी,
तिथं मुरगी काटा सुरी
सांगा आम्हाला मुरगी कटलेट काटा कु ठाय हो?
शोधा सारे साठे चला,
आज पाडा वाडे चला
वामनदादा आमचा घुगरी घाटा कु ठाय हो?